esakal | Video : वरातीत नवरदेवाची फजिती; नाचता नाचता तोल गेला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Video : वरातीत नवरदेवाची फजिती; नाचता नाचता तोल गेला अन्...

Video : वरातीत नवरदेवाची फजिती; नाचता नाचता तोल गेला अन्...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात सध्या लग्नसराईचे (Wedding Season) दिवस सुरु आहेत. लॉकडाउनमुळे एप्रिल, मे मध्ये होणारी अनेक लग्न रखडली होती. मात्र, आता अनलॉकच्या टप्प्यात अनेक जण कोरोना गाईडलाइन्स (Guidelines) पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करत आहेत. लग्न म्हटलं की यात सगळ्यात उत्साहाचा क्षण म्हणजे लग्नाची वरात. नव्या सुनबाईला घेऊन जाण्यासाठी मुलाकडील लोक वाजतगाजत तिच्या दारापाशी येतात. त्यामुळे सहाजिकच नवरदेवाकडील सारी मंडळी आनंदात हलकी, ब्रॅण्ड आणि बाँजोच्या तालावर नाचत असतात. सध्या अशाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही हे तितकंच खरं. (groom-dancing-on-his-baraat-falls-from-friends-shoulder-video-goes-viral)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव लग्नाच्या वरातीत तुफान डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे 'बाबूजी जरा धीरे चलो' (Babuji Zara Dheere Chalo) हे गाणं लागल्यावर नवरदेव आणि त्याची मित्रमंडळी बेफाम होऊन नाचतात. पण, याचवेळी असा प्रसंग घडतो की वरातीत नाचत असलेल्या लोकांनाही हसू अनावर होत नाही.

हेही वाचा: प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल

'बाबूजी जरा धीरे चलो' हे गाणं लागल्यावर नवरदेवाच्या मित्राने त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि डान्स करु लागला. तर दुसरीकडे नवरदेवदेखील थाटात खांद्यावर बसून नाचत होता. मात्र, नाचता नाचता या नवरदेवाचा तोल गेला आणि तो धाडकन जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यामुळे नवरदेव लाजेने गोरामोरा झाला होता. परंतु, कुटुंबियांनी लगेच त्याच्याकडे धाव घेत त्याला उठवण्यासाठी मदत केली. मात्र, त्यानंतर वरातीत डान्सऐवजी हास्यकल्लोळ माजला. विशेष म्हणजे या व्हिडीओ वरातीमधीलच एका व्यक्तीने काढला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ निरंजन महापात्रा या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाख ७० हजार व्ह्युज या व्हिडीओला मिळाले असून अनेक जण भन्नाट कॅप्शन देत तो शेअर करत आहेत.

loading image