
नवी दिल्ली : देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये उन्हाचा चटका वाढत चालला असताना येथील जमिनीच्या पातळीवरील ओझोनच्या प्रदूषणामुळेही नागरिकांचा श्वास गुदमरल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कोलकता, बंगळूर, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये या प्रदूषणाने अधिक गंभीर रूप धारण केल्याचे दिसून येते. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या (सीएसई) तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रदूषणकारी ओझोन हा वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोनपेक्षा वेगळा असतो.