एअर इंडियाच्या खासगीकरणास मंजुरी; केंद्रिय मंत्रिमंडळाचा निर्णय

वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने एअर इंडियाच्या खासगीकरणास मंजुरी दिली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने एअर इंडियाच्या खासगीकरणास मंजुरी दिली. मंत्रिगटाने एअर इंडियासाठीच्या "एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' आणि समभाग खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे आता केंद्र सरकारकडून अधिकृत पातळीवर एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एअर इंडियाच्या खासगीकरणासाठीचा प्रस्ताव या महिन्यात जाहीर करण्यात येण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. याआधी सप्टेंबर 2019 मध्ये मंत्रिगटाची शेवटची बैठक झाली होती. मागील वर्षी "एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटीव्ह मेकॅनिझम'ने (एआयएसएएम) एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्‍सप्रेसमधील केंद्र सरकारच्या 100 टक्के हिश्‍श्‍याच्या विक्रीच्या प्रक्रियेची पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी दिली होती. यासोबतच एअर इंडियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या "एआयएसएटीएस'मधील हिश्‍श्‍याचीही विक्री केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group of Ministers approve Expression of Interest for Air India sale