esakal | खऱ्या भारताचे दर्शन! मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम तरुणांनी तयार केली साखळी
sakal

बोलून बातमी शोधा

bangaluru.jpg

हिंसा नेहमीच वाईट अनुभव देऊन जाते, मात्र बंगलुरुमधील एका घटनेला आठवणीत ठेवले जाईल.

खऱ्या भारताचे दर्शन! मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम तरुणांनी तयार केली साखळी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बेंगलुरु- हिंसा नेहमीच वाईट अनुभव देऊन जाते, मात्र बंगलुरुमधील एका घटनेला आठवणीत ठेवले जाईल. बेंगलुरुचे काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा पी नवीन याने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे बंगळुरु शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात संतप्त जमावाने मूर्ती यांच्या  घराची तोडफोड केली. यावेळी जाळपोळही करण्यात आली. मूर्ती यांच्या घराच्या समोर एक हनुमानाचे मंदिर आहे. मुस्लीम युवकांनी साखळी बनवून या मदिराला वाचवण्याचे काम केले आहे.  मुस्लीम तरुणांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुस्लीम तरुणांनी एकमेकांचे हात धरुन साखली तयार केली. अशा प्रकारे तरुणांची मंदिराचे रक्षण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

बंगळुरु हिंसाचाराची घटना कटाचा भाग असू शकते, राजकारण्यांचा हात असल्याचा होतोय...

वादग्रस पोस्ट प्रकरणी बंगळुरुमध्ये तणाव आहे.  या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पी नवीन याला देखील अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे.  धार्मिक भावना दुखावलेला अल्पसंख्याकांच्या गटाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्च करावा लागला, तसेच अश्रू धुळकांड्याही फोडाव्या लागल्या आहेत. 

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक
 

पी नवीन यांने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. हजारोच्या संख्येने एकत्र येत अल्पसंख्याक समुदायाने मूर्ती यांचे घर गाठले. यावेळी जमावाने काँग्रेस आमदाराच्या घराची तोडफोड केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत संतप्त जमावाने 15 हून अधिक कार जाळल्या गेल्या आहेत. पोलिस पथकावरही हल्ला करण्यात आला असून यात जवळपास 60 पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकीकडे हिंसा घडत असताना काही मुस्लीम तरुणांनी यावेळी केलेली कृती कौतुकास्पद आहे. तरुणांनी हातांची साखळी तयार करत मंदिरांचे रक्षण केले. या उदाहरणावरुन देशाचे खरे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे. या देशात सर्व धर्मांना मानणारे आहेत. तसेच एकमेकांच्या धर्मांचा सन्मान आणि आदर करणारे आहेत हे दिसून येत आहे. 

(edited by-kartik pujari)

loading image