
मंत्र्यांच्या ताफ्यामुळे रस्त्यावर बॅरिकेडिंग अन् गेला चिमुकलीचा जीव
आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आंध्र प्रदेशच्या नवनियुक्त महिला आणि बालकल्याण मंत्री उषा श्रीचरण यांच्या ताफ्यामुळे रस्ता अडवण्यात आला होता. यामुळे कुटुंबीयांना मुलीला घेऊन रुग्णालयात जाण्यास उशीर झाला. मुलीच्या उपचारात उशीर झाल्याने मृत्यू झाला, असे पालकांनी पोलिसांना सांगितले. (small girl died)
मंत्री उषा यांच्या विजय ताफ्यासाठी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेडिंग (Barricading ) करण्यात आले होते. पोलिसांनी मंत्र्याचा ताफा येत असल्याने रस्ता अडवला होता. याचवेळी कल्याणदुर्गातील चेर्लोपल्ली गावातील आठ महिन्यांच्या चिमुरडीला तिचे कुटुंबीय ऑटोमधून रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, रस्ता अडवल्याने (Barricading ) वेळीच दवाखान्यात जाता आले नाही. यामुळे चिमुकलीला वेळीच उपचार (Delay in treatment) मिळाला नाही. यातच तिचा मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा: दिल्लीत हनुमान जयंती मिरवणुकीत दगडफेक; वाहनांची तोडफोड, पोलिस जखमी
चौकशीची मागणी
ही घटना सायंकाळी उशिरा घडली. आंध्र प्रदेशातील (andhra pradesh) प्रमुख विरोधी तेलुगू देसम पक्षाचे नेते कलावा श्रीनिवासुलू यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याला अमानुष घटना म्हणत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
Web Title: Group Of Ministers Barricading On The Road Small Girl Died Delay In Treatment Andhra Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..