esakal | औद्योगिक क्षेत्राला घरघर ! जुलैत 'या' आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ 2.1 टक्के 
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक क्षेत्राला घरघर ! जुलैत 'या' आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ 2.1 टक्के 

विकासदरातील घसरणीनंतर आर्थिक आघाडीवर देशाला दुसरा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावली असून, जुलै महिन्यात आठ पायाभूत सेवा क्षेत्रांत केवळ 2.1 टक्के वाढ नोंदवली आहे. या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेवरील मंदीचे ढग आणखी गडद झाल्याचे स्पष्ट झाले. 

औद्योगिक क्षेत्राला घरघर ! जुलैत 'या' आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ 2.1 टक्के 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः विकासदरातील घसरणीनंतर आर्थिक आघाडीवर देशाला दुसरा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावली असून, जुलै महिन्यात आठ पायाभूत सेवा क्षेत्रांत केवळ 2.1 टक्के वाढ नोंदवली आहे. या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेवरील मंदीचे ढग आणखी गडद झाल्याचे स्पष्ट झाले. 

विशेष म्हणजे, जुलै 2018 मध्ये याच प्रमुख क्षेत्रांनी 7.3 टक्‍क्‍यांचा वृद्धिदर नोंदवला होता. जुलै महिन्यात कोळसा, कच्चे तेल, रिफायनरी उत्पादने आणि नैसर्गिक वायू उत्पादन नकारात्मक राहिल्याचा हा परिणाम आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात पोलाद, ऊर्जानिर्मिती, सिमेंट उत्पादनातील वाढ अनुक्रमे 6.6, 4.2 आणि 7.9 टक्के राहिली. तर, गतवर्षी याच कालावधीत ती अनुक्रमे 6.9, 6.7 आणि 11.2 टक्के इतकी होती.

दरम्यान, खतनिर्मितीत किंचित सुधारणा झाली असून, जुलैमध्ये खत उत्पादन 1.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. जुलै 2018 मध्ये ते 1.3 टक्के होते. 

तिमाही आधारावरही घसरण 
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ अवघी 3 टक्के राहिली. गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान ती 5.9 टक्के होती. एप्रिलपासून वृद्धिदरात सातत्याने घसरण पाहायला मिळत असून, एप्रिलमध्ये या क्षेत्रांचा वृद्धिदर 5.8 वरून 5.2 टक्‍क्‍यांवर आला होता. नंतर मेमध्ये तो 4.3 व जूनमध्ये अवघा 0.7 टक्के होता. 

loading image
go to top