
GST Rate Cuts Boost Sales, Light Up Dhanteras Market
SakalGST Rate Cuts Boost Sales, Light Up Dhanteras Market
नवी दिल्ली : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी लागू झालेल्या मालमत्ता आणि वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणांमुळे करकपातीचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केला. तसेच पंतप्रधान मोदींनी दिलेली ही दिवाळी भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे धनत्रयोदशीच्यानिमित्ताने देशभर सराफा बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणे यांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.