Oil Theft : तेलाच्या पाईपलाईनवर होते पत्र्याचे शेड, पठ्ठ्याने कमावले 400 कोटी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oil Theft

Oil Theft : तेलाच्या पाईपलाईनवर होते पत्र्याचे शेड, पठ्ठ्याने कमावले 400 कोटी!

सुरत : पैसा कमावण्यासाठी कोण काय फंडा वापरेल, सांगता येत नाही. एका पठ्ठ्याने जे काय केलंय ते वाचून तुम्ही आवाक् व्हाल. तेल चोरीमधून त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ४०० कोटी रुपये कमावले आहेत.

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये जिथून तेल कंपन्यांची पाईपलाई गेली तिथे हा पत्र्याचं शेड भाड्याने घ्यायचा. त्यानंतर पाईपलाईनला छेद पाडून ऑईल चोरी करायचा. त्यातून त्याने कोट्यवधींची माया जमवली.

हेही वाचाः ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

संदीप गुप्ता असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. बिहरामध्येही त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. आज गुजरातमध्ये पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा: Mumbai News : शाळेच्या वॉश रुममध्ये 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी...

सुरतचे पोलिस आयुक्त अजय कुमार यांनी सांगितलं की, संदीप गुप्ताविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं. त्याने राजस्थान आणि गुजरात प्रकरणामध्ये अंतरिम जामीन घेऊन पलायन केलं होतं. आज सुरत गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

संदीप गुप्ता हा इंडियन ऑईल, ओएनजीसी या कंपन्यांच्या पाईपलाईनचा मार्ग शोधायचा. त्यानंतर त्या पाईपलाईवर एखादं पत्र्याचं शेड भाड्याने घ्यायचा. पुढे कामगारांच्या मदतीने पाईपलाईनला छेद पाडून त्यातून ऑईल चोरी करायचा.

एकावेळी तो तीन ते चार टँकर भरत होता. पुढे ते तेल तो काळ्या बाजारात विकायचा. गुजरात एटीएसने संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर २०हून अधिक गुन्हे दाखल होते.

टॅग्स :GujaratOil