गुजरातमधील कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत आग; 5 रुग्णांनी गमावला जीव

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयात 33 रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 11 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरु असल्याची माहिती मिळते आहे. आग आटोक्यात आली असून या रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येते. 

गुजरातमधील राजकोट येथील कोविड रुग्णालयातील आयसीयूत आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेत 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयात 33 रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 11 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरु असल्याची माहिती मिळते आहे. आग आटोक्यात आली असून या रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat 5 people died after a fire broke out at Shivanand COVID Hospital in Rajkot