
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेने सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. दुकानदाराच्या मुलाला ‘बेटा’ म्हणल्याच्या किरकोळ कारणावरून दलित तरुण निलेश राठोड यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्यात त्यांचा गुरुवारी भावनगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांनी पीडित कुटुंबासह निषेध आंदोलन सुरू केले आहे.