Gujarat Assembly Election 2022 : दोन टप्प्यात निवडणुका, आयोगाचा मास्टरप्लान तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election 2022 : दोन टप्प्यात निवडणुका, आयोगाचा मास्टरप्लान तयार

नवी दिल्ली : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्य तारखा जाहीर न केल्याने विरोधकांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. हिमाचल प्रदेशच्या तारखा जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगावरील केंद्राच्या वर्चस्वाबाबत विविध आरोप सुरू आहेत. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या तारखा जाहीर करण्यासाठीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे.

आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे २ नोव्हेंबरपर्यंत कधीही जाहीर करू शकतो. गुजरातमधील निवडणूक दोन टप्प्यांत होऊ शकते. ८ डिसेंबर रोजी (रूवार) हिमाचल प्रदेशाच्या बरोबरीने गुजरातमध्येही मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा१४ ऑक्टोबर रोजी जाहीर केल्या. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशात आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. तथापि हिमाचलच्या बरोबरीने आयोगाने गुजरातच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

गुजरातच्या प्रस्तावित निवडणुकीतील पहिला टप्पा ३० नोव्हेंबर किंवा ‘ डिसेंबर आणि दुसरा टप्पा ४ डिसेंबरच्या आगेमागे असू शकतो. गुजरात निवडणुकीबाबत भाजप, काँग्रेस आणि तिघेही आपापली रणनीती बनवत आहेत. आम आदमी पक्षाने निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची आपली सातवी उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

भाजपचे अनेक बडे नेतेही गुजरात दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रणनीती ठरवण्यासाठी सौराष्ट्रातील पक्षनेत्यांची बैठक घेतली. पंप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जुरातमधील झंझावात सुरू झाला आहे. आप व कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी मोदी यांच्या मातोश्रींवरही अभद्र टीका केल्याने भाजपने तो भावनिक मुद्दा बनविला आहे.