
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोल तसेच, सध्याच्या निकाल पाहता भाजप आघाडीवर आहे. या सर्वा घडामोडी पाहात राजकीय वर्तुळातदेखील भाजप गड राखणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Gujarat Assembly Election Congress important decision even before the results )
घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतल आहे. अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच, काँग्रेस आमदारांना तात्काळ राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहे. असेही सांगण्यात आले आहे.
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विजयी आमदारांना आज रात्री 8 वाजेपर्यंत जयपूरला हॉटेलमध्ये हलवलं जाईल. आणि या गोष्टीची पुष्टी अशोक गेहलोत देणार आहेत असंही सांगण्यात येत आहे. (Gujarat Assembly Election Result 2022)
गुजरातमध्ये आतापर्यंत लागोपाठ 6 वेळा भाजपची सत्ता आली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलेल. 2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.