Gujarat assembly election: हार्दिक पटेलची भविष्यवाणी खरी ठरणार?

Hardik Patel
Hardik Patelesakal
Updated on

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. अशातच भाजप उमेदवार हार्दिक पटेलने निकालापूर्वी मोठी भविष्यवाणी केली आहे. पुन्हा भाजपची सत्ता येईल असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. (Gujarat Assembly Election Results 2022 Hardik Patel asked how many seats will bjp get )

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी हार्दिक पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने १३५-१४५ जागांवर भाजप सत्ता स्थापन करेल. अशी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Hardik Patel
HP Election Results 2022 : मतमोजणी संपली! कॉंग्रेसला ४० तर भाजपला २५ जागांवर विजय

तसेच, भाजप कामाच्या जोरावर पुन्हा निवडुण येईल. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहिती आहे की, भाजपने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या आहेत. त्यांनी भाजपलाच मतदान दिले आहे. कारण त्यांचे भविष्य सुरक्षित आहे. असा दावाही त्याने केला आहे.

अशातच एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३०, काँग्रेसला ४० ते ५० आपला ३ ते ५ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळू शकतात. एक्झिट पोल आणि हार्दिक पटेलचा विश्वास पाहाता गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्ता स्थापन करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Hardik Patel
Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी; वाचा निकालाचे अपडेट्स

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांनी निवडणुकीसाठी प्रचार केला. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपच्या जागा वाढताना दिसत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी होण्याची शक्यता आहे. भाजपला आतापर्यंत सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप यापेक्षा अधिक जागा मिळवेल, अशी शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com