Narendra Modi: महाराष्ट्रतील उद्योग गुजरातमध्ये जाताच मोदींनी घेतला रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

Narendra Modi: महाराष्ट्रतील उद्योग गुजरातमध्ये जाताच मोदींनी घेतला रोजगार मेळावा

वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा चौथा मोठा प्रकल्प राज्यातून गेला आहे. राज्यात येणारे मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र हे सुरू असतानाच गुजरातमध्ये शनिवारी रोजगार मेळाव्यांचे सरकारकडून आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण केलं ते म्हणाले 'की गुजरातसाठी केंद्र सरकार 10 लाख नोकऱ्या देण्यावर काम करत आहे. पुढील काळात सरकार तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची संख्या वाढवणार आहे. येत्या काही महिन्यांत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित केले जातील.

तरुणांना दिल्या जाणाऱ्या सरकारी नोकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढेल. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे २ नोव्हेंबरपर्यंत कधीही जाहीर करू शकतो. गुजरातमधील निवडणूक दोन टप्प्यांत होऊ शकते. ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशाच्या बरोबरीने गुजरातमध्येही मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GujaratNarendra Modijobs