शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद् गीता; गुजरात सरकारचा निर्णय | Bhagavad Gita in School Syllabus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat bhagavad gita will be include in school syllabus of class 6th to 12th

शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद् गीता; गुजरात सरकारचा निर्णय

गुजरात सरकारने इयत्ता ६ वी ते १२ वीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आपल्या परंपरांविषयी जोडणे तसेच त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागील उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून गुजरातमधील शाळांमध्ये हा बदल लागू केले जाण्याची अपेक्षा आहे.

शिक्षण मंत्री वाघानी यांनी सांगितले आहे की भगवद्गीता काही भागांमध्ये सादर केली जाईल. हा पवित्र ग्रंथ इयत्ता ६ वी ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरूपात सादर केला जाईल. इयत्ता ९ वी ते १२ वी साठी, प्रथम भाषेच्या पाठ्यपुस्तकात कथा आणि मजकूर या स्वरूपात सादर केले जाईल. शालेय अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीचा समावेश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक ठरेल, असे परिपत्रकात पुढे नमूद केले आहे.

"श्रीमद भगवद्गीतेची मूल्ये, तत्व आणि महत्त्व सर्व धर्मातील लोकांनी स्वीकारले आहे. इयत्ता 6 व्या वर्गात श्रीमद भगवद् गीता अशा प्रकारे सादर केली जाईल की, विद्यार्थ्यांना त्यात रस निर्माण होईल," असे गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद् गीतेचे महत्त्व सांगितले जाईल. नंतर श्लोक, श्लोक गीते, निबंध, वादविवाद, नाटके, प्रश्नमंजुषा इत्यादी स्वरूपात कथा सादर केल्या जातील. विद्यार्थ्यांना सर्व काही सरकारकडून पुरवले जाईल", असे ते म्हणाले.

हेही वाचा: 'तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, श्रीमद भगवद्गीता इयत्ता ६ ते १२ पासून पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि पठणाच्या स्वरूपात सादर केली जाईल. इयत्ता ६ वी ते १२ वीसाठी, विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद् गीतेचा सखोल परिचय करून दिला जाईल.

"श्रीमद भगवद् गीतेवर श्लोक पठण, निबंध, चित्रे, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा इ. असाव्यात. अभ्यासक्रम ऑडिओ व्हिज्युअलसह प्रिंट केला पाहिजे," असे परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद् गीतेचा समावेश करण्याच्या निर्णयाचे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा: रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच; मिळेल 50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग

Web Title: Gujarat Bhagavad Gita Will Be Include In School Syllabus Of Class 6th To 12th

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratBhagavad Gita
go to top