गुजरातमध्ये भाजपला मोठा झटका! खासदाराने पक्षासह, लोकसभा सदस्यत्वाचा दिला राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात राज्यातील भरुचचे खासदार मनसुख वसावा यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात राज्यातील भरुचचे खासदार मनसुख वसावा यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांना आपला राजीनामा पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसावा यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.  

गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांना लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी म्हटलंय की, माझ्या चुकांमुळे पक्षाला नुकसान होऊ नये, यासाठी मी राजीनामा देत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat BJP Bharuch MP Mansukh Vasava resigns from the party