गुजरातच्या अर्थसंकल्पात गायींच्या संरक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद

गुजरातमधील भाजप सरकारने आज आपला २ लाख ४३ हजार ९६५ कोटी रुपयांचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
Gir Cow
Gir Cowesakal

अहमदाबाद : गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारने आज गुरुवारी (ता.तीन) आपला २ लाख ४३ हजार ९६५ कोटी रुपयांचा शेवटचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Gujarat Budget 2022-23) सादर केला. यात लोकानुनयी, गायींचे संरक्षण व भटक्या जनावरणांसाठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री कनू देसाई (Kanu Desai) यांनी गेल्या वर्षीचे २ लाख २७ हजार २९ कोटींच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्ती तरतूदीचे अर्थसंकल्प (Budget) मांडला. गेल्या वर्षी २२ लाख नोकऱ्या पाच वर्षांमध्ये निर्माण करण्याचे वचन देण्यात आले होते. देसाई म्हणाले, की २००१ मध्ये राज्याचा जीडीपी १.२५ लाख कोटीने वाढले होते. कोविडचा प्रतिकुल परिणाम असताना राज्याला जीडीपी दोन अंकी गाठण्याची अपेक्षा आहे. (Gujarat Budget RS 500 Crore For Cow Protection)

Gir Cow
मणिपूरमध्ये काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत राडा, १३ वाहनांचे मोठे नुकसान

गायींचे महत्त्व आणि त्यांचा संबंध भगवान कृष्णाशी जोडून अर्थमंत्र्यांनी ५०० कोटींची तरतूद मुख्यमंत्री गौ माता पोषण योजनेसाठी जाहीर केले. यात गौशाळा आणि पांजरपोळसचे व्यवस्थापन केले जाईल. १०० कोटी रुपयांचे अधिकचे अर्थसंकल्पीय तूरतूद करण्यात आली आहे. यातून शहर आणि ग्रामीण भागातील भटक्या जनावरांचा प्रश्न सोडवला जाईल. सरकारने २१३ कोटी रुपयांचे सेंद्रिय शेतीसाठी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com