esakal | Gujarat CM LIVE: उद्या दोन वाजून वीस मिनिटांनी होणार शपथविधी
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat CM: उद्या दोन वाजून वीस मिनिटांनी होणार शपथविधी

Gujarat CM: उद्या दोन वाजून वीस मिनिटांनी होणार शपथविधी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उद्या २ वाजून वीस मिनिटांनी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली आहे.

भुपेंद्र पटेल यांनी नुकतीच राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

  • गुजरातच्या मुख्यमंत्री पदी नव्याने निवड झालेले भुपेंद्र पटेल यांचा शपथविधी उद्या होणार आहे. त्यांच्यासोबत इतर कुणाचाही शपथविधी होणार नाहीये. याबाबतची माहिती राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

  • भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली, तो क्षण!

  • गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आल्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

भुपेंद्र पटेल हे आमदार आहेत मात्र, त्यांच्या नावाबद्दलचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीये. बैठकीत काय निर्णय होतोय, ते पाहण्यासाठी आम्ही थोडी वाट पाहू.

- यमल व्यास, प्रमुख प्रवक्ते, गुजरात भाजप

  • भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री; थोड्याचवेळात होणार अधिकृत घोषणा

  • उपमुख्यमंत्री नितीन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीपुर्वीच सुचक वक्तव्य केलं, गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेला असावा अस विधान त्यांवी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदा बाबात त्यांचं नाव असल्याच्या चर्चेवर उत्तर देताना ते म्हणाले की, या बद्दलचा सर्व निर्णय हायकमांड घेईल.

  • गुजरातचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी सध्या भाजपच्या सर्व आमदारांची बैठक गांधीनगर येथे सुरु आहे.

loading image
go to top