
Fake PMO Officer: बनावट 'पीएमओ टीम'मध्ये सीएमओमधील अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग? वडील म्हणाले...
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याची बातवणी करणाऱ्या गुजरातमधील किरण भाई पटेलसोबत आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी अमित हितेश पंड्या हा गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, किरणभाई पटेल यांना अटक करताना गुजरातचे रहिवासी अमित हितेश पंड्या आणि जय सीतापारा यांना सोडून देण्यात आले होते, कारण पोलिसांना वाटले की ते कदाचित किरणभाई पटेलच्या जाळ्यात सापडले असतील.
वरील सर्व किरण भाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील "अधिकृत टीम" मध्ये होते, ज्यांनी Z-plus सुरक्षा कवच, पंचतारांकित हॉटेल्समध्ये अधिकृत निवास व्यवस्था आणि बरेच काही मिळवून J&K सुरक्षा आणि प्रशासनाला गंडवले होते.
गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी अमित पंड्या (हितेश पाड्याचे वडील) यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी श्रीनगरला बोलावले होते याची त्यांना माहिती आहे. तसेच त्यांनी आपला मुलगा काही चुकीचं काम करूच शकत नसल्याचं म्हलटं.
"माझ्या मुलावर मला खूप विश्वास आहे. तो कधीही अशा कोणत्याही कामात सहभागी होणार नाही."पोलिसांनी त्याच्याबद्दल काय लिहिलंय हे मला माहीत नाही. मला माहीत नसलेल्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायला मला आवडणार नाही. काही ठोस माहिती असती तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन, असही हितेशचे वडील म्हणाले.