Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat election 2022  59 percent polling recorded till 5pm second phase

Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

अहमदाबाद : गुजरातमध्ये आज दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. गुजरातमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

आज गुजरातमध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांना मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मतदानावेळी चालत जाणे म्हणजे प्रचाराचाच एक भाग असून हे आचार संहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसने केला.