Gujarat Election 2022: 'मी घडवला हा गुजरात'; PM मोदींचा निवडणुकीपूर्वी नवा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Election 2022 PM Narendra Modi launches new election slogan in Gujarati I have made this Gujarat

Gujarat Election 2022: 'मी घडवला हा गुजरात'; PM मोदींचा निवडणुकीपूर्वी नवा नारा

Gujarat Election 2022: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातमध्ये राजकीय हालचाली वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमधील कपराडा येथे पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी दाखल झाले. यावेळी बोलताना गुजरातच्या तरुणांनी आता कमान हाती घेतली आहे. गुजरातमध्ये द्वेष पसरवणारे कधीच निवडून आलेले नाहीत. काही लोक गुजरातला बदनाम करण्यासाठी आले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अशा लोकांना गुजरातची जनता धडा शिकवेल, असेही त्यांनी सांगितलं.

गुजरातमध्ये भाजपचा विजय होईल

रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, गुजरातमधील माझ्या आदिवासी बांधवांच्या आशीर्वादाने मी माझी रॅली सुरू करत आहे हे माझे भाग्य आहे. यावेळी गुजरात मला जिंकून विक्रम करणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती भाषेत नवा निवडणूक नारा देखील दिला, 'मी घडवला हा गुजरात'. गेली 20 वर्षे राज्याला बदनाम करण्यात घालवणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना गुजरात नेस्तनाबूत करेल, असेही ते म्हणाले.

गुजरातमध्ये भाजपने सलग 6 विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. यावेळी गुजरातमध्ये काँग्रेससोबतच आम आदमी पार्टी (AAP)ही भाजपला आव्हान देत आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजप सातवा विजय नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: Car Buying Tips: मारुती सुझुकी स्विफ्ट की टाटा टियागो? स्वस्तात चांगली कार कोणती? जाणून घ्या

हेही वाचा: Andheri Bypoll Result: आघाडीमुळे नव्हे, तर भाजपमुळे ऋतुजा लटकेंचा विजय; आशिष शेलारांचा दावा

मोदींचा गुजरातमध्ये रोड शो

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Gujarat) यांनीही गुजरातमध्ये रोड शो केला होता. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. पीएम मोदी आज भावनगरमध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांचे होमग्राऊंड गुजरातचा हा पहिला दौरा आहे.

भाजपचे प्रवक्ते यज्ञेश दवे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी भावनगरमध्ये होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचवेळी 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :GujaratNarendra Modi