

Heavy Rain Effects
esakal
अहमदाबाद: गुजरातमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा कहर कायम असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे आतापर्यंत सुमारे ३८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून ३५२ जणांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत ४०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.