Gujarat High Court : गुजरातमध्ये वकिलांचे ‘काम बंद’

न्यायाधीशांच्या बदलीचा बार असोसिएशनकडून निषेध
Gujarat High Court
Gujarat High Court
Updated on

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीश निखिल एस. करियल यांची पाटणा उच्च न्यायालयातील प्रस्तावित बदलीच्या निषेधार्थ गुजरात उच्च न्यायालय संघटनेच्या (सीएचसीएए) सर्व वकिलांनी गुरुवारी सामूहिकपणे काम बंद आंदोलन केले. ‘हा न्यायव्यवस्थेचा मृत्यू’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

न्यायाधीश करियल यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली होणार असल्याचे समजताच गुजरात बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली. बदलीचा निषेध करण्यासाठी असोसिएशनचे शेकडो सदस्य वकील, वरिष्ठ वकील मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात जमले. एवढ्या मोठ्या संख्येने न्यायालयात जमण्याचे कारण मुख्य न्यायाधीशांनी विचारले असता वरिष्ठ वकील मिहीर ठाकोर म्हणाले, ‘‘न्या. करियल यांच्या पाटणा उच्च न्यायालयातील प्रस्तावित बदलीविरोधात आम्ही सर्वजण आहोत.’’

बदलीची माहिती कोठून मिळाली, असे मुख्य न्यायाधीश कुमार यांनी विचारले असता, ‘बार अँड बेंच’च्या संकेतस्थळावरून याबाबत समजल्याचे वकिलांनी सांगितले. सामान्यपणे न्यायाधीशांची बदली करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सल्लामसलत करतात, याकडे वरिष्ठ वकिलांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com