गुजरातेत शुल्कवाढीचे इंजेक्‍शन वैद्यकीय शिक्षण महागले

महेश शहा 
मंगळवार, 31 जुलै 2018

अहमदाबाद : गुजरातमध्ये वैद्यकीय आणि त्यासंबंधातील पूरक शिक्षणाच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. सरकारी महाविद्यालयांतील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांच्या वार्षिक शुल्कात सुमारे 400 ते 500 टक्के वाढ करण्यात आली आहे. फिजिओथेरपीच्या शुल्कातही वाढ झाली आहे. ही शुल्कवाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अमलात येईल. 

अहमदाबाद : गुजरातमध्ये वैद्यकीय आणि त्यासंबंधातील पूरक शिक्षणाच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. सरकारी महाविद्यालयांतील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांच्या वार्षिक शुल्कात सुमारे 400 ते 500 टक्के वाढ करण्यात आली आहे. फिजिओथेरपीच्या शुल्कातही वाढ झाली आहे. ही शुल्कवाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अमलात येईल. 

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ही शुल्कवाढ जाहीर केली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या विद्यावेतनाचा मोठा बोजा सरकारवर पडत असल्यामुळे ही शुल्कवाढ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या शुल्कवाढीचा फटका गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे सांगत कॉंग्रेसने या शुल्कवाढीला विरोध केला आहे. 

पदवीपूर्व शिक्षणासाठी... 
- पदवीपूर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क प्रतिवर्षी सहा हजारांवरून 25 हजार रुपये. 
- दंतवैद्यकीय शाखेचे शुल्क आता चार हजारांवरून 20 हजार रुपये. 
- फिजिओथेरपीचे शुल्क तीन हजारांवरून 15 हजार रुपये. 

पदव्युत्तर शिक्षणासाठी... 
- आता वार्षिक 35 हजार रुपयांचे शुल्क. 
- या विद्यार्थ्यांना सरकारकडून दरमहा 41 हजार रुपये विद्यावेतन. 
- "मास्टर ऑफ डेण्टल सर्जरी'च्या विद्यार्थ्यांना आता दर वर्षी 25 हजार रुपये शुल्क. 
- सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 हजार रुपये विद्यावेतन. 
- या विद्यार्थ्यांनाही आता दर वर्षी 45 हजार रुपये शुल्क. 

06 
राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये 

1300 
वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा 

200 
दंत वैद्यकीयसाठीच्या जागा 

300 
फिजिओथेरपीसाठीच्या जागा 

सरकारने ही शुल्कवाढ त्वरित मागे घ्यावी. उत्सवांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तो निधी गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे वळवावा. 
- मनीष दोशी, काँग्रेसचे प्रवक्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gujarat, medical education gets expensive