Morbi Bridge Accident : मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी सरकारची मोठी कारवाई; मुख्य अधिकाऱ्याला केलं निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Morbi Bridge Collapse

मोरबी शहरात मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून 135 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Morbi Bridge Accident : मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी सरकारची मोठी कारवाई; मुख्य अधिकाऱ्याला केलं निलंबित

Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातच्या मोरबी शहरात मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून 135 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. याप्रकरणी कठोर कारवाई करत राज्य सरकारनं पालिका अधिकारी संदीपसिंग जाला यांना निलंबित केलंय.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

यापूर्वी गुरुवारी पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी केली होती. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुजरातमधील ओरेवा या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीसोबत झालेल्या कराराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीचं काम ज्या कंत्राटदाराकडं सोपविण्यात आलं होतं, तो अशा कामासाठी पात्र नसल्याचं न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा: Accident : दिवाळी, छठपूजा संपवून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; बस-कारच्या धडकेत 11 जण ठार

उपकंत्राटदारानं केबल्स फक्त पेंट आणि पॉलिश केल्या. गंजलेल्या साखळ्या बदलल्या नाहीत, त्यामुळं हा अपघात झाला. ओरेवा कंपनी या कामासाठी पूर्णपणे अयोग्य होती. यापूर्वी 2007 मध्येही दुरुस्तीचं कंत्राट कंपनीला देण्यात आलं होतं. गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेच्या तपासावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रविवारी पूल कोसळून 135 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: Pakistan : गोळीबार झालेल्या Imran Khan ची तब्येत आता कशीय? जाणून घ्या हल्ल्याशी संबंधित 5 मोठे अपडेट्स

टॅग्स :BjpGujaratCongress