गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस वापरणार 'हा' फॉर्म्युला

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आम्ही ही खबरदारी घेत आहोत. आमच्याबरोबर 71 पैकी 65 आमदार माउंट अबूत राहणार आहेत. उर्वरीत सहा आमदारांपैकी अल्पेश ठाकूर आणि धावलसिंह झला यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे ते पक्षासाठी मतदान करतील ही अपेक्षा नाही.

अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या 65 आमदारांना राजस्थानमधील माउंट अबू येथे नेणार आहे. या ठिकाणी हे आमदार 24 तासांसाठी असणार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार फुटू नये व भाजपकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी काँग्रेसकडून हा फॉर्म्युला वापण्यात येणार आहे.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आम्ही ही खबरदारी घेत आहोत. आमच्याबरोबर 71 पैकी 65 आमदार माउंट अबूत राहणार आहेत. उर्वरीत सहा आमदारांपैकी अल्पेश ठाकूर आणि धावलसिंह झला यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे ते पक्षासाठी मतदान करतील ही अपेक्षा नाही.

मंगळवारी गुजरातच्या उच्च न्यायालयाने देखील काँग्रेसची याचिका फोटाळली आहे. ज्यामध्ये अल्पेश ठाकूर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीना दिल्यानंतर त्यांना मतदानासाठी अपात्र ठरवण्यात यावे ही मागणी केली गेली होती. आमदार अल्पेश ठाकूर आणि आमदार धावलसिंह झला यांनी बंडखोरी केली आहे. उर्वरीत तीन आमदार हिम्मतसिंह पटेल, इमरान खेडावाला आणि शैलेश परमार हे आमच्यात सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण, आगामी जगन्नाथ यात्रेचे आयोजन गुरूवारी अहमदाबादमधील त्यांच्या मतदारसंघातून होणार आहे. 

दरम्यान, भाजपकडून केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ओबीसी नेते जुगल ठाकूर हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसने आमदार चंद्रीका चुडासामा आणि वलासाड येथील पक्ष नेते गौरव पांड्या यांना उमेदवारी दिली आहे. अमित शहा आणि स्मृती इराणी हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांसाठी आता निडवणूक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat Rajya Sabha Elections Congress Will Send 65 Mlas To Mount Abu