Video: पाण्यात अडकलेल्या बसला जेसीबीने काढले बाहेर...

वृत्तसंस्था
Thursday, 13 August 2020

एक बस पुलाखाली पाण्यात अडकली होती. चालकाने प्रयत्न करूनही ती पुढे अथवा मागे जात नव्हती. शिवाय, बसमध्ये प्रवासी असल्यामुळे सर्वजण अडकून पडले होते. अखेर जेसीबीने बसला बाहेर काढले.

अहमदाबाद (गुजरात): एक बस पुलाखाली पाण्यात अडकली होती. चालकाने प्रयत्न करूनही ती पुढे अथवा मागे जात नव्हती. शिवाय, बसमध्ये प्रवासी असल्यामुळे सर्वजण अडकून पडले होते. अखेर जेसीबीने बसला बाहेर काढले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खतरनाक विमान लँडींगचे व्हिडिओ व्हायरल...

राजकोट गोंडल पुलाखाल राज्य परिवहनची बस पाण्यात अडकली होती. जेसीबीच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले. उपस्थितांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, जेसीबीचे आकर्शन अनेकांना असते. जेसीबी काम करत असला तरी अनेकजण तेथे थांबून त्याकडे पाहताना दिसतात. शिवाय, व्हिडिओ पाहणाऱयांची संख्याही मोठी आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जागोजागी पाणी तुंबल्याचे दिसत आहे. राज्यात आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय, येत्या 16 व 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात राज्य परिवहन बस अडकली होती. जेसीबीने तिला अलगद बाहेर काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujarat state transport bus being pulled jcb video viral