Gujarat Woman Assault : प्रियकरासोबत फरार झालेल्या विवाहितेसोबत भयानक कृत्य; सर्वांसमोर शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले अन्... ९ जणांना अटक

Woman Torture Case : पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहणाऱ्या महिलेला पतीसह काही जणांनी पकडून आणल्याचा आरोप आहे. महिलेला ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली झाडाला बांधून मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
Gujarat Woman Assault Case: What Happened in Surendranagar?

Gujarat Woman Assault Case: What Happened in Surendranagar?

esakal

Updated on: 

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातून विवाहित महिलेवर कथित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहायला गेलेल्या महिलेला पतीसह काही जणांनी पकडून आणले. त्यानंतर ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली महिलेला झाडाला बांधून तिच्यावर मारहाण केल्याचा आणि तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक कृत्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com