
अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ येथील बन्नी गवताळ प्रदेशात चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी येथील तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती बुधवारी अधिकृत सूत्रांनी दिली. देशात चित्ता प्रकल्पांतर्गत ज्या दहा जागांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये बन्नी येथील गवताळ प्रदेशाचा समावेश आहे.