Gujrat Result 2022 : पक्षाचा पाया डगमगला असताना 5 वर्षात भाजपने असा कोणता करिश्मा केला?

Narendra Modi
Narendra Modisakal

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला असून आत्तापर्यंतच्या निकालात भाजपने जवळपास १५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. विधानसभेत एवढ्या जागेवर विजय मिळवणारा भाजप हा एकमेव पक्ष होण्याकडे घोडदौड करत आहे. २०१२ मध्ये भाजपला ११५ आणि २०१७ मध्ये फक्त ९९ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता थेट दीडशतकाकडे वाटचाल केल्यामुळे भाजपने मोठा विजय केल्याचं चित्र आहे. तर मागच्या पाच वर्षात भाजपचा पाया गुजरातमध्ये डगमगल्याचं चित्र असतानाही या निवडणुकांत बाजी मारल्याने सर्वांच्या नजरा टवकारल्या आहेत. तर मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळात बदल करूनही काँग्रेसने अशी कोणती जादूची कांडी फिरवली असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

डगमगता गुजरात आणि मोदींचे रोड शो

दोन वेळा मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी केल्यानंतर गुजरातमध्ये पक्षाचा पाया डगमगता झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे सध्याच्या गुजरात विधानसभा निवडणुकांत केंद्रस्थानी राहिले आहेत. निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जवळपास २७ रॅली आणि ४० किलोमीटरचा रोड शो केला आहे. त्यामध्ये त्यांनी १६ विधानसभा मतदारसंघांना कव्हर केलं होतं. त्याचबरोबर मागच्या पाच वर्षात गुजरातमध्ये अनेक कामं झाली. तर या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन हा जवळपास दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला हलवल्यामुळे भाजपला फायदा झाला.

मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळात केलेले बदल

आरक्षणाच्या मुद्द्यावर पाटीदार समाजामध्ये भाजपबाबत असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने वेळीच पावले उचलत जातीय अस्त्र खेळत पाटीदार समाजाच्या भूपेंद्रभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर विजय रूपानी यांना आपला कार्यकाळ यामुळे पूर्ण करता आला नाही. याबरोबर भाजपच्या केंद्रीय नेते असलेले मोदी आणि शाह यांनी पूर्ण मंत्रीमंडळात बदल केले होते. त्यामुळे पाटीदार समाजामध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

तरूणांना संधी

या विधानसभा निवडणुकीत भाजपने दिग्गज नेत्यांचे तिकीट कापले आणि त्यांना डच्चू दिला. तर यावेळी भाजपने अनेक तरूणांना संधी दिली. माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासारख्या दिग्गजांचे तिकीटही भाजपने कापले. पण त्याचा फायदाच झाल्याचं पाहायला मिळालं.

पाटीदार समाजाला सोबत घेतलं

काँग्रेस नेते हार्दिक पटेलांच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवटला होता. ही भाजपसाठी महागात पडणारी गोष्ट होती. त्यामुळे पाटीदार समाजातील भाजपबाबतचा असंतोष कमी करण्यासाठी पाटीदार समाजाच्या भूपेंद्रभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. त्यानंतर भाजपने आणखी एक कार्यकर्ता गळाला लावला आणि थेट पाटीदार समाजाचा आणि काँग्रेसचा नेता हार्दिक पटेलांना आपल्या पक्षात सामावून घेतलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com