गुजरातेत ATSची मोठी कारवाई; 200 किलो ड्रग्ज जप्त

 drug
drug Sakal

अहमदाबाद : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली असून २०० किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गिअर बॉक्समध्ये लपवून दुबईहून हे ड्रग्ज भारतात आणले जात असताना गुजरात एटीएस आणि डीआरआयने ही कारवाई केली आहे. हे ड्रग्ज फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकत्ता येथे आणण्यात आलं होतं. त्यानंतर राबवलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आली आहे.

(200 KG Drugs Detained in Gujrat)

दरम्यान, तब्बल १२ गिअर बॉक्समध्ये हे ड्रग लपवण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. दुबईच्या जेबेल अली पोर्टवरून हे ड्रग पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली असून सहा महिन्याच्या तपासानंतर यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०० किलो ड्रग गुजरात एटीएसने ताब्यात घेतलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com