esakal | पाटील की पटेल? गुजरात मुख्यमंत्रीपदासाठी BJP कुणाला देणार संधी
sakal

बोलून बातमी शोधा

CR Patil and Nitin Patel

पाटील की पटेल? गुजरात मुख्यमंत्रीपदासाठी BJP कुणाला देणार संधी

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि मोठा राजकीय भुकंप झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा निर्णय होणार. या बैठकीपुर्वीच उपमुख्यमंत्री नितीन पाटील यांनी गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा असावा असे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? की नवीन तिसऱ्यालाच संधी मिळणार हे आता पाहावे लागणार आहे.

गुजरातमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आलंय. त्यातच आता उपमुख्यमंत्री नितीन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीपुर्वीच सुचक वक्तव्य केलं, गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेला असावा अस विधान त्यांवी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदा बाबात त्यांचं नाव असल्याच्या चर्चेवर उत्तर देताना ते म्हणाले की, या बद्दलचा सर्व निर्णय हायकमांड घेईल.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून हा भाजपच्या परंपरेचा भाग असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले. राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रूपानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुका लढवत आहे आणि २०२२ मधील निवडणूक देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढली जाईल, असेही स्पष्ट केले.

loading image
go to top