Faridabad Case : आईशी वाद झाल्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणीवर गुडगाव–फरीदाबाद रोडवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Haryana Crime News.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला मारुती सुझुकी इको या वाहनातून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. सुमारे तीन तास ती तरुणी गाडीत बंदिस्त होती. या काळात तिने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरड केली; मात्र दाट धुके, कमी दृष्यमानता आणि निर्जन परिसरामुळे तिचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही..या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. फरीदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पीडित तरुणीचे आईशी भांडण झाले, त्यानंतर ती घरातून निघून गेली. मैत्रिणीकडे जात असल्याचे तिने बहिणीला सांगितले होते आणि रात्री परत येणार असल्याचेही कळवले होते. मात्र, उशीर झाल्याने तिला सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तिने एका खासगी वाहनचालकाकडून लिफ्ट घेतली..Buldhana Crime : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, नवऱ्यानं बायकोसह 4 वर्षाच्या चिमुरड्याला कुऱ्हाडीने वार करुन संपवलं; रियांश वाचू शकला असता, पण....त्या वाहनात आणखी काही पुरुष असल्याची तिला कल्पना नव्हती. घरी सोडण्याऐवजी आरोपींनी तिला गुडगाव–फरीदाबाद रोडकडे वळवले. दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृष्यमानता अत्यंत कमी होती. हनुमान मंदिराच्या पुढे नेऊन फरीदाबादच्या दिशेने जात असताना ती तरुणी जवळपास तीन तास गाडीतच अडकून राहिली. या काळात तिने मदतीसाठी ओरड केली; मात्र रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने तिचा आवाज कुणापर्यंतही पोहोचला नाही..कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, एसजीएम नगरमधील राजा चौकाजवळील एका हॉटेल परिसरात पहाटे सुमारे तीनच्या सुमारास चालत्या गाडीतच दोघा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गाडीतून खाली फेकून देण्यात आले..गाडीतून फेकल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून तिला १२ टाके घालावे लागले आहेत. घटनेनंतर तिने तात्काळ बहिणीशी संपर्क साधला. बहिणीने तिला फरीदाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला; मात्र कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी कोतवली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.