"T20 क्रिकेटची सुरुवात मीच केली"; राम रहिमचा सत्संगमध्ये अजब दावा : Gurmeet Ram Rahim | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gurmeet Ram Rahim

Gurmeet Ram Rahim: "T20 क्रिकेटची सुरुवात मीच केली"; राम रहिमचा सत्संगमध्ये अजब दावा

बागपत : पंचवीस वर्षांपूर्वी T20 क्रिकेटची सुरुवात मीच केली होती, असा अजब दावा बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेला डेरा सच्चा सौदा आश्रमाचा भोंदू बाबा गुरमीत राम रहिम सिंग यानं केला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत इथं ऑनलाईन सत्संगमध्ये त्यानं हा दावा केला, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Gurmeet Ram Rahim I started T20 cricket Ram Rahim strange claim in online satsang)

हेही वाचा: ShivSena: मुलीचं नाव 'शिवसेना'; कट्टर शिवसैनिकानं बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

गुरमीत राम रहिम हा सध्या ४० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो सध्या ऑनलाईन सत्संगाचे कार्यक्रम घेत असून आपल्या भक्तांना तो तत्वज्ञानाचे आणि आध्यात्माचे धडे देत आहे. अशाच एका सत्संगामध्ये त्यांनं आपण T10 आणि T20 या क्रिकेटमधील फॉरमॅटची सुरुवात केल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: Maharashtra-Karnataka Border Issue: सीमाभागातील नागरिकांना मिळणार 'हे' लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राम रहिमनं म्हटलं की, चोवीस वर्षांपूर्वी आपण सिरसा गावातील जलालआनामध्ये T10 आणि T20 क्रिकेटची सुरुवात केली होती. तेव्हा मोठं मोठे खेळाडू म्हणत होते की, हे काय क्रिकेट आहे? त्यावेळी कोणी खेळायला येत नव्हतं आणि आता संपूर्ण जगानं याला आपलं केलंय. राम रहिम असंही म्हणतो की, आठ धावांचा अठ्ठा देखील मी सुरु केलेल्या या क्रिकेटमध्ये होता. आात येणाऱ्या काळात हाच अठ्ठा देखील छक्क्यावर भारी पडेल.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

शाही अंदाजात ऑनलाईन सत्संग सुरु

रोहतक इथल्या सुनारिया तुरुंगातून राम रहिमला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला असून तो या तात्पुरत्या सुट्टीसह डेरा सच्चा सौदा आश्रमात परतला आहे. इथं सध्या तो शाही जीवन जगत आहे. इथं सध्या तो पूर्वीप्रमाणं शाही अंदाजात स्टेज लाऊन हातात मोरपंख घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन सत्संग करतो आहे. तसेच तो भजन गायन करतोय गाणी म्हणतोय तर आपल्या भक्तांना गुरुमंत्र देखील देतोय.

टॅग्स :sportsDesh news