

Guru ka Taal
esakal
आग्रा म्हटलं की ताजमहाल आणि आग्रा किल्ला डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, या शहरात इतिहासाची साक्ष देणारी अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'गुरु का ताल' गुरुद्वारा. शीख समाजासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या गुरुद्वाराचा इतिहास शीखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाशी जोडलेला आहे. आज हे ठिकाण देश-विदेशातील भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनले आहे.