Guru Nanak Jayanti: शीख धर्माची स्थापना करणारे गुरु नानक; जाणून घ्या 10 गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

गुरु नानक यांची आज जयंती (November 30) आहे.

गुरु नानक यांची आज जयंती (November 30) आहे.  त्यांची 551 वी जयंती साजरी केली जात आहे. गुरु नानक जयंती कार्तिक पोर्णिमेला साजरी केली जाते. गुरु नानक शीखांचे पहिले गुरु होते. गुरु नानक यांचे अनुयायी त्यांना नानक, नानक देव जी, बाबा नानक आणि नानकशहा या नावांनीही संबोधित करतात. त्यांचा जन्मदिवस गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. नानक यांचा जन्म राय भोई की तलवंडी येथे झाला होता, हा भाग सध्या पाकिस्तानमध्ये येतो. गुरु नानक यांच्या जीवनाशी संबंधित 10 गोष्टी जाणून घेऊया... 

-गुरु नानक यांचा जन्म कार्तिक शुक्ल पोर्णिमेच्या दिवशी झाला होता. दरवर्षी कार्तिक पोर्णिमेला त्यांची जयंती साजरी केली जाते. 

- गुरु नानक यांच्या वडिलांचे नाव मेहता कालू आणि आईचे नाव तृप्ता देवी होते. त्यांच्या बहिणीचे नाव नानकी होते. 

- गुरु नानक सुरुवातीपासून सांसारिक विषयांपासून उदासीन होते. ते आपला पूर्ण वेळ तपश्चर्या आणि आध्यात्मिक चिंतनात घालवत.

- गुरु नानक लहान असताना अनेक चमत्कारिक घटना घडल्या, त्यानंतर गावकरी त्यांना दिव्य व्यक्ती मानू लागले. 

-गुरु नानकांनी सुरुवातीपासूनच रुढीवादाविरोधात संघर्ष सुरु केला. धर्म प्रचारकांना त्यांच्या चुका सांगण्यासाठी नानकांनी अनेक तीर्थस्थळांना भेट दिली.  त्यांनी लोकांना धर्मांधतेपासून दूर राहण्याची शिकवन दिली. 

- गुरु नानकांचा विवाह 1487 मध्ये झाला. त्यांना दोन मुले होती, ज्यांचे नाव श्रीचन्द आणि लक्ष्मीचन्द होते. 

-गुरु नानक म्हणायचे ईश्वर एकच आहे. मूर्तीपूजा आणि अनेक देवांच्या उपासनेला त्यांनी अनावश्यक ठरवले. हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला. 

- गुरु नानकांसंबंधी एक गोष्ट खूप प्रचलित आहे. एकदा गुरु नानक यांच्या वडिलांनी त्यांना 20 रुपये दिले होते आणि या पैशातून सच्चा सोदा करण्यास सांगितले होते. नानक सौदा करण्यासाठी घराबाहेर पडले. रस्त्यात त्यांना साधू-संत दिसले. त्यांनी साधू-संतांना 20 रुपयांचे अन्न खाऊ घातले आणि ते घरी परत आले. वडिलांनी जेव्हा विचारले की काय सौदा केला? नानक म्हणाले-' साधुंना अन्न खाऊ घातले, हाच खरा सच्चा सौदा आहे'

- गुरु नानकांचे म्हणणे होते की, ईश्वर माणसाच्या हृद्यामध्ये राहतो.  हृद्यात निर्दयता, निंदा, द्वेष, राग इत्यादी विकार असल्यास अशा हृद्यांमध्ये परमात्मा कधीही विराजमान होणार नाहीत.

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guru Nanak Jayanti 2020 know 10 things about his life