Nuh Violence: एक रॅली, तीन हजारांचा जमाव..४ मृत्यू; हरियाणा हिंसाचारामागील कारण काय?

Nuh violence reason: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७० ते ८० लोकांच्या जमावाने सेक्टर ५७ येथे स्थित असलेल्या जामा मशिदीला आग लावली. सध्या नूह, गुरुग्राम आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.
haryana nuh violence reason
haryana nuh violence reasonANI

haryana communal clashes

गुरुग्राम- हरियाणाच्या नूह जिल्ह्यामध्ये हिंसाचार उभाळून आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिंसाचारामध्ये आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून यात दोन गृहरक्षक दलाच्या जवानांचाही समावेश आहे. जमावाने गुरुग्राममधील एका मशिदीला आग लावली असून त्यात नायम ईमाम या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७० ते ८० लोकांच्या जमावाने सेक्टर ५७ येथे स्थित असलेल्या जामा मशिदीला आग लावली. सध्या नूह, गुरुग्राम आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.

nuh clashes
nuh clashesANI

सोमवारी नूह जिल्ह्यात 'ब्रिज मंडळ अभिषेक रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक नूह चौकात जमा झाले होते. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी या रॅलीचे आयोजन केले होते.

माहितीनुसार, पोलिस प्रशासनाकडून रॅलीसाठीची परवानगी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून या रॅलीचे नियमित आयोजन केले जात आहे. भाविकांचा जथ्था जेव्हा नूह चौकात आला तेव्हा १२ ते १५ लोकांच्या जमावाने लोकांवर दगडफेक सुरु केली. त्यामुळे हिंसाचाराला सुरुवात झाली.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नूह जिल्ह्यात दोन्ही समाज शांतीने राहात आहेत.

पण, ज्यापद्धतीने हिंसाचारामध्ये दगडं, शस्त्र, बंदूकांचा वापर केला गेला त्यानुसार या हिंसाचारामागे मास्टरमाईंड असल्याचा संशय येतो. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, तसेच यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री म्हणाले.

nuh clashes
nuh clashesANI

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूह आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेटवर बंदी आणण्यात आली आहे. सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंसाचारावर लगाम लावण्यासाठी उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा दलांना प्राचारण करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. असे असले तरी अजूनही काही असामाजिक घटकांनी मुख्य रस्ते अडवल्याची माहिती आहे.

haryana police
haryana policeANI

हिंसाचारामागील कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये गायींच्या तस्करीप्रकरणात दोन मुस्लिम व्यक्तींचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आरोपी असलेला आणि बजरंग दलाचा कार्यकर्ता मोनू मानेसर नूह येथील यात्रेसाठी आला होता.

स्थानिक मुस्लिम समुदायाने मोनु मानेसरच्या रॅलीतील सहभागावर विरोध दर्शवला होता. मोनु मानेसर आणि त्याचे साथीदार ब्रिज मंडळ अभिषेक यात्रेसाठी आल्याची बातमी पसरल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नूह चौकात रॅलीसाठी जमा झालेल्या भाविकांवर दगडफेक करण्यात आली. तसेच तेथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना पेटवून देण्यात आले. यावेळी जवळपास ३ ते ४ हजार लोकांनी नलहार मदिरामध्ये आश्रय घेतला होता. जवळपास ५ तासांनतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.

कोण आहे मनू मानेसर?

मनू मानेसर (वय ३०) बजरंग दलाचा कार्यकर्ता असून तो मेवाड येथे एक गौरक्षक गट चालवतो. गौरक्षेसंबंधी तो अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतो. राजस्थानच्या भारतपूर येथे दोन मुस्लिम तरुण एका गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळलले होते. याप्रकरणात मनू मानेसर मुख्य आरोपी असून तो गेले अनेक महिने फरार आहे.

पोलिसांनी त्याला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला, पण आधीच सुगावा लागल्याने तो फरार होत आहे. मनू मानेसर याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने नूह येथे होणाऱ्या रॅलीसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. तसेच लोकांना या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात हजर राहण्याचे आवाहन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com