Gwalior Truck Accident: ग्वाल्हेर ट्रक अपघातातील जखमी भाविकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; मोफत उपचारांचे निर्देश

Gwalior Truck Accident, Mohan Yadav, Free Medical Treatment : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे ट्रक अपघातात जखमी झालेल्या भाविकांची मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रुग्णालयात भेट घेतली.
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Meets Injured Devotees at Gwalior Hospital

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Meets Injured Devotees at Gwalior Hospital

esaal

Updated on: 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण ट्रक अपघातातील जखमींची मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी १९ ऑक्टोबर रोजी जयारोग्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना दर्जेदार आणि पूर्णपणे मोफत उपचार देण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले. उपचारात कोणतीही निष्काळजी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, गरज भासल्यास गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com