Gyanesh Kumar यांच्याविरोधात 2 कोटींची लाच मागितल्याचा आरोप; 20 वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा उघडणार, सरकारकडून चौकशीचे आदेश

Gyanesh Kumar Faces Fresh Bribery Allegations : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २० वर्षांपूर्वी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केरळ सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
Gyanesh Kumar यांच्याविरोधात 2 कोटींची लाच मागितल्याचा आरोप; 20 वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा उघडणार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Updated on: 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे २० वर्षांपूर्वीचे कथित लाचखोरीचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एका माजी कंत्राटदाराने केला आहे. या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिली आहे.

Loading content, please wait...