ज्ञानवापीवरील पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gyanvapi Masjid Survey

ज्ञानवापीवरील पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार

लखनऊ : ज्ञानवापी खटल्याच्या आजच्या सुनावणीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेत पुढील तारीख दिली आहे. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी २६ मे रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात होणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 26 तारखेला प्रथम सिव्हिल प्रोसिजर ऑर्डर 07, नियम 11 अंतर्गत सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता 26 मे रोजी वैधतेवर सुनावणी होणार आहे. (Gyanvapi case News)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली सुमारे ४५ मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली होती. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर (Gyanvapi Masjid Survey) अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पाहणी अहवालात ज्ञानवापी मशिदीत कमळ, सापाची फणा आणि अनेक प्रकारच्या हिंदू खुणा आढळून आल्याचंही सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडं काशी विश्वनाथ मंदिरानेदेखील (Kashi Vishwanath Temple) मशिदीच्या तळमजल्यावर दुसरं शिवलिंग असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Gyanvapi Masjid Next Hearing Will Be Held On May 26

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar PradeshCourt
go to top