esakal | राम मंदिर देणगीवरुन कुमारस्वामी म्हणाले, नाझींनी जर्मनीत जे केलं तेच RSS करतंय
sakal

बोलून बातमी शोधा

kumarswamy main.jpg

अशाच पद्धतीने जर्मनीत नाझींनी हिटलरच्या काळात केले होते. त्यावेळी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा गोष्टींमुळे देश कुठे जाईल, असा सवालही त्यांनी केला. 

राम मंदिर देणगीवरुन कुमारस्वामी म्हणाले, नाझींनी जर्मनीत जे केलं तेच RSS करतंय

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) गंभीर आरोप केला आहे. अयोध्या येथील राम मंदिर उभारण्यासाठी जे देणगी देत नाहीत त्यांच्या घरावर खूण करण्यात येत आहे. नाझींनी ज्याप्रमाणे जर्मनीत केले होते. अगदी तसेच आरएसएस करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आरएसएसने कुमारस्वामी यांचे आरोप फेटाळले असून याचे उत्तर ही द्यायचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सलग टि्वट करत कुमारस्वामी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, असं वाटतंय की राम मंदिर उभारण्यासाठी पैसे गोळा करणारे लोक देणगी देणारे आणि न देणाऱ्या लोकांच्या घरावर वेगवेगळ्या खुणा करत आहेत. अशाच पद्धतीने जर्मनीत नाझींनी हिटलरच्या काळात केले होते. त्यावेळी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा गोष्टींमुळे देश कुठे जाईल, असा सवालही त्यांनी केला. 

इतिहास तज्ज्ञांचा हवाला देताना कुमारस्वामी यांनी दावा केला की, आरएसएसचा जन्म त्याचवेळी झाला जेव्हा जर्मनीत नाझी पार्टीची स्थापना झाली. माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, चिंता ही आहे की, जर आरएसएस नाझींप्रमाणेच निती अवलंबत असेल तर काय होईल. देशात आता लोकांचे मुलभूत अधिकार हिसकावून घेतले जात आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे, कारण लोक खुलेपणाने आपले विचार व्यक्त करु शकत नाहीत. 

हेही वाचा- पावरी सोडा, हे बघा! पाकिस्तानी मुलीच्या पार्टी व्हिडिओवर स्मृती इराणींची प्रतिक्रिया

येणाऱ्या दिवसांत माध्यमांच्या स्वातंत्र्यावर शंका व्यक्त करताना ते म्हणाले की, काय होईल जेव्हा मीडिया सरकारचे विचार व्यक्त करेल. सध्याची स्थिती पाहता समजते की, देशात काहीही होऊ शकते. दरम्यान, आरएसएसचे माध्यम प्रभारी ई.एस प्रदीप यांनी कुमारस्वामी यांचे वक्तव्य उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याचे म्हटले.