
सिमला : हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने बुधवारी राज्यातील जनजीवन विस्कळित झाल्याची माहिती, प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून राजधानी सिमला येथील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.