Video : सोशल मीडियावर परदेशी पाहुण्यांच्या हनुमान चालीसेची धूम; तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanuman Chalisa

Video : सोशल मीडियावर परदेशी पाहुण्यांच्या हनुमान चालीसेची धूम; तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

Trending Hanuman Chalisa Video : सोशल मीडियावर असे हजारो व्हिडिओ निदर्शनास येतात, ज्यामध्ये परदेशी लोक भारतीय संस्कृती अंगीकारताना दिसून येतात. आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओंमधून परदेशी नागरिक संस्कृत शिकताना, ओम जय जगदीश हरे गाताना, गीता पाठ करताना तर, कधी कृष्ण भक्ती करताना पाहिले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर याच परदेशी पाहुण्यांचा हनुमान चालिसा म्हणतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ काशीच्या मंदिरातील आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ वाराणसी येथील असून, यामध्ये हनुमान चालीसाचे पठण करताना तीन परदेशी नागरिक दिसून येत आहे. हनुमान चालिसा म्हणण्यासोबतच हे नागरिक वेगवेगळी वाद्येदेखील वाजवत दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये परदेशी नागरिकांकडून गायली जात असलेली हनुमाना चालिसा म्हणण्याची शैली थोडीफार वेगळी आहे, परंतु, ती ऐकताना नक्कीच मंत्रमुग्ध व्हायला होते.

हेही वाचा: Global Hunger Index 2022 Report : पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती गंभीर

व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल असून, काहींनी या परदेशी नागरिकांच्या अनोख्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे, तर काहींनी ही हनुमान चालिसा मंत्रमुग्ध करणारी असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, ही हनुमान चालिसा ऐकून नक्कीच हनुमानजी त्यांना आशीर्वाद देतील यात शंका नसल्याचे म्हणटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.