Happy New Year 2021: कवितेच्या माध्यमातून PM मोदींनी दिल्या खास शुभेच्छा!

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. 

नवी दिल्ली : जगभरासह देशात नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. 

 

2020 मध्ये कोरोना हाहाकार माजला. संपूर्ण वर्ष निराशेच्या गर्तेनं घेरलेलं होते. त्यानंतर आता नव्या वर्षात नवी सकारात्मकता घेऊन पुढे जाण्याच्या संकल्प घेऊन सर्वांना पुढे जायचे आहे. यासंदर्भात मोदींनी देशवासियांना खास संदेश दिला आहे. यासाठी मोदींनी एक खास कविता लिहिली आहे.

'अभी तो सूरज उगा है..' शिर्षकाखालील कवितेच्या माध्यमातून मोदींनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. @MyGovIndia च्या ट्विटर अकाउंटवरुन पीएम मोदींच्या आवाजातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मोदींनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी ऐकायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy new year 2021 Prime Minister Narendra Modi extends New Year greetings