घरी परतताना भीषण अपघात; एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या 4 मुलांसह 5 जणांचा दुर्दैवी अंत, ट्रकचालक गाडी सोडून पसार
Hapur Road Accident : रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ते परतत असताना हाफीजपूरजवळील पडाव येथे महामार्गावरील रोड कटवर एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पाचही जण ट्रकखाली चिरडले गेले.
हापूर : हापूरच्या हाफीजपूर पोलिस ठाणे (Hafizpur Police Station) परिसरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पुरुष आणि चार मुलांचा समावेश आहे.