सरकारकडे लशीसाठी पुरेसे पैसे; केंद्राने सांगितलं सेंट्रल व्हिस्टा का गरजेचं?

सरकारकडे लशीसाठी पुरेसे पैसे; केंद्राने सांगितलं सेंट्रल व्हिस्टा का गरजेचं?
Summary

सेंट्रल व्हिस्टाच्या ( Central Vista) बांधकामावरुन विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार टीका चालवली आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Union minister Hardeep Puri ) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- सेंट्रल व्हिस्टाच्या ( Central Vista) बांधकामावरुन विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार टीका चालवली आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Union minister Hardeep Puri ) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधक या प्रोजेक्टबाबत चुकीचा दृष्टीकोण तयार करत आहेत. मला जाणवतंय की गेल्या काही महिन्यापासून चुकीचा दृष्टीकोण तयार करण्यात आलाय. प्रोजेक्टला कायदेशीर परवानगी मिळाली आहे. शिवाय कोणत्याही ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूला स्पर्श केला जाणार नाही, ते जशा आहेत तशाच राहतील, असं पुरी म्हणाले. (Hardeep Singh Puri calls out criticism on Central Vista)

१३,४५० कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा पोजेक्टवरुन केंद्र सरकारवर काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते यांनी यावर टीका करताना म्हटलं की, कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. अशा काळात केंद्र सरकारने लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. पण, केंद्र सेंट्रल व्हिस्टावर पैसे खर्च करत आहे. हरदीप पुरी यांनी सेंट्रल व्हिस्टा महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. कारण, जुनी इमारत सेस्मिक झोन २ मध्ये येते. त्यामुळे मोठा भूकंप आला तर धोका निर्माण होऊ शकतो. नवे भवन सेस्मिक झोन ४ मध्ये येते.

हरदीप पुरी म्हणाले की, मला कळत नाही हा २०,००० कोटींचा आकडा कोठून आणण्यात आलाय? ज्याच्या मनात जे येतय, ते बोलत आहे. ५१ मंत्रालयांचे ऑफिस, मेट्रोंना जोडने, नवी संसद भवन, न्यू इंदिरा गांधी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हे सर्व मिळून १३,००० ते १५,००० कोटी खर्च येईल. म्हटलं जातंय की, २० हजार कोटी महामारीच्या काळात खर्च केले जाताहेत, त्याऐवजी ते लसीकरणासाठी वापरा. केंद्राने लसीकरणासाठी ३५,००० कोटींना मंजुरी दिली आहे. लसीकरणासाठी पैशाची कमी नाही, पैसे पुरेसे आहेत. लशीची उपलब्धता वेगळी गोष्ट आहे.

सरकारकडे लशीसाठी पुरेसे पैसे; केंद्राने सांगितलं सेंट्रल व्हिस्टा का गरजेचं?
मोदींना आठवण करून द्या; अजित पवार यांची आठवलेंना विनंती

दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नवी संसद भवन, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, केंद्रीय सचिवालाय आणि इतर इमारती यांचे बांधकाम सुरु आहे. पोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांनी वाढवता येणे शक्य आहे. सध्या येथे ५७,००० कर्मचाऱ्यांची क्षमता आहे. नवीन इमारतीच्या परिसरात १६ हजार गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा असेल. तसेच नव्या सर्विस रोडमुळे वाहतूक सुरळीत होईल, असं सांगण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com