Haridwar Kumbh : हरिद्वार कुंभमेळा २०२७ मध्ये लाखो भाविकांना मोफत नेत्रसेवा मिळणार; देहरादूनमध्ये ‘नेत्र कुंभ’ अभियानाचा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Free Eye Care for Haridwar Kumbh : हरिद्वार कुंभमेळा २०२७ मध्ये देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मेवाटपाची सुविधा देण्यासाठी ‘नेत्र कुंभ’ अभियान सुरू करण्यात येणार आहे.
Free Eye Care for Haridwar Kumbh

Free Eye Care for Haridwar Kumbh

esakal

Updated on: 

देहरादून : आगामी हरिद्वार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देहरादून येथील दून मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी (२९ नोव्हेंबर २०२६) ‘नेत्र कुंभ-२०२७’चा शंखनाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कुंभमेळ्याला देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविक आणि गरजू नागरिकांना मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मेवाटपाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आरोग्यमंत्री सुबोध उनियाल आणि हंस फाउंडेशनच्या माता मंगला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर हरिद्वारमध्येही मोठ्या प्रमाणावर नेत्रसेवेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.

Loading content, please wait...