हार्ले डेव्हिडसनकडून किमतीत वाढ नाही

रॉयटर्स
मंगळवार, 26 जून 2018

अमेरिकेच्या उत्पादनांवर युरोपीय समुदायाने जादा कर लावला असला तरी दुचाकींच्या किमतीत वाढ केली जाणार नाही, असे हार्ले डेव्हिडसन कंपनीने स्पष्ट केले आहे. 
 

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या उत्पादनांवर युरोपीय समुदायाने जादा कर लावला असला तरी दुचाकींच्या किमतीत वाढ केली जाणार नाही, असे हार्ले डेव्हिडसन कंपनीने स्पष्ट केले आहे. 

अमेरिकेने युरोपीय समुदायातील देशांमधून येणाऱ्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून युरोपीय समुदायाने अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. याचा फटका प्रामुख्याने अमेरिकेतील हार्ले डेव्हिडसनसह इतर दुचाकी कंपन्यांना बसणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर हार्ले डेव्हिडसन कंपनीने म्हटले आहे, की युरोपमध्ये कंपनीच्या दुचाकींवरील कर वाढणार आहे. यामुळे वितरकांसाठी आणि ग्राहकांसाठी दुचाकींच्या किमतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही. यामुळे कंपनीवर या वर्षभरात 3 ते 4.5 कोटी डॉलरचा अतिरिक्त बोजा पडेल. हा बोजा कंपनी सहन करणार आहे. 
 

Web Title: Harley Davidson does not increase the price

टॅग्स