Haryana Fire : हरियाणातील कंपनीला भीषण आग; बचावकार्य सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

Haryana Fire : हरियाणातील कंपनीला भीषण आग; बचावकार्य सुरू

गुरूग्राम : हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथील एका ऑटो पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. बिलासपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तर बचावकार्य सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(Haryana Fire Accident)

तर कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून अग्निशामक दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

टॅग्स :HaryanaFire Accident