Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र

haryana government : तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणातील नायब सिंग सैनी सरकार अडचणीत सापडले आहे. विरोधी पक्ष काँग्रेस आणि जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांनी नायब सिंग सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला आहे.
Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र

haryana government

विरोधी पक्षनेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे सचिव शादी लाल कपूर यांनी हरियाणा राजभवनाला पत्र लिहून राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज्यपालांकडे १० मे रोजी वेळ मागितला आहे. त्यामुळे हरियाणातील सरकार कोसळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या राजकारणात अचानक गोंधळ वाढला आहे. कारण तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला आहे. भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आमदारांनी सांगितले. राज्यात भाजप सरकार अल्पमतात असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते भूपेंद्र हुडा यांनी केली आहे. दुसरीकडे भाजप नेते म्हणतात, सरकार सुरक्षित आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपी नेते दुष्यंत चौटाला म्हणतात, काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला तर जेजेपी त्याला बाहेरून पाठिंबा देईल.

Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र
Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

राज्याच्या राजकारणाची बारकाईने जाण असलेल्यांचे म्हणणे आहे की, पाठिंबा घ्यायचा आणि द्यायचा हा किस्सा अजून संपलेला नाही. हरियाणामध्ये खाती उघडणे बाकी आहे. काँग्रेस आणि जेजेपी भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात काहीही कमी पडत नाहीत. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यासंदर्भात आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे संकेत दिले आहेत.

'जेजेपी' आमदारांच्या पाठिंब्याने स्थापन झाले होते सरकार -

हरियाणात काँग्रेस आणि जेजेपी या दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही. मात्र, गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी विधानसभेच्या निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र येऊ शकतात, असे म्हटले होते. 

Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र
Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com